Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई ?

सनी आणि शर्वरी एकमेकांना करतात डेट !

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल  आणि कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा नुकताच राजस्थानमधील माधोपूर येथे शाही थाटात पार पडला.सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कतरिना आणि विकीने त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ !शर्वरी आणि विकीचा भाऊ  सनी कौशल या दोघांच्या अफेअरबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

मिळालेल्या एका रिपोर्टनुसार, विकीचा भाऊ सनी आणि शर्वरी एकमेकांना डेट करत आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या मेहंदी सोहळ्याच्या फोटोमुळे शर्वरी आणि  सनी यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू झाली.
▪️कोण आहे शर्वरी वाघ ?
शर्वरीचा जन्म 14 जून 1996 मध्ये मुंबईमध्ये झाला. ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. रूपारेल कॉलेजमध्ये शर्वरीने शिक्षण घेतलं आहे. बंटी और बबली-2 मधून केलेलं आहे.बंटी और बबली 2 या चित्रपटामध्ये शर्वरीसोबत पंकज त्रिपाठी, सिद्धांत चतुर्वेदी ,सैफ अली खान  आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित  झाला होता. या चित्रपटातील शर्वरी आणि सिद्धांतच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.