Take a fresh look at your lifestyle.

गुनाटच्या पंढरीत दत्तनामाचा गजर !

हरिनाम सप्ताहास झाला प्रारंभ.

सतीश डोंगरे
शिरूर : श्री क्षेत्र दत्तपंढरी गुनाट (ता.शिरुर) येथे गावातील मान्यवरांच्या हस्ते विणा पुजन करुन अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात करण्यात आली. दि. १२ डिसेंबर ते दि. १९ डिसेंबर दरम्यान काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरीपाठ, किर्तन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. गणेश कर्पे यांनी दिली.
रविवारी (दि. १९) रोजी पहाटे ४ वाजता दत्तप्रभूंचा जन्म सोहळा, तसेच सकाळी ९ ते ११ वाजता   हभप पुंडलिक महाराज नागवडे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार असुन रात्री ९ ते ११ दरम्यान लळीत संग्रहाचा कार्यक्रम होणार असुन दरवर्षीप्रमाणे यावर्षी दत्त मंदीर जीर्णोद्धार प्रसंगी मौलीक योगदान देणारे मच्छिंद्र जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच कोविड १९ चे नियमाची अंमलबजावणी करूनच कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन दत्त देवस्थान, दत्त भजनी मंडळ, दत्त सेवेकरी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
यावेळी सरपंच गणेश कोळपे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश कोळपे, ह.भ.प. पुंडलिक महाराज नागवडे, माजी सरपंच रंगनाथ भोरडे, माऊली बहिरट, गहिनीनाथ डोंगरे, कृषी सहाय्यक जयवंत भगत, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बहिरट, संभाजी गाडे, संतोष फंड, आप्पासाहेब वाघमारे, विष्णू करपे , विठ्ठल करपे, बबन गोरडे, सुभाष भोरडे, नानाभाऊ गोरडे, नंदू करपे, बबनराव करपे भाऊसाहेब करपे, मल्हारी भैरट, विठ्ठल भगत, रामदास भोरडे, शांताराम बहिरट, माऊली बारवकर, दत्त भजनी मंडळ, दत्त सेवेकरी मंडळातील सर्व सदस्य व समस्थ ग्रामस्थ गुनाट मधील भाविक भक्त मोठ्या संख्येने विणा पुजन कार्यक्रमास उपस्थित होते.