Take a fresh look at your lifestyle.

आज ‘गीता जयंती’; गीता संदेश तुम्हाला माहित आहे का?

गीतेतील अध्याय आणि त्यांची नावे जाणून घ्या.

जवळपास 5 हजारहून अधिक वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस (शुक्ल एकादशी) गीता जयंती म्हणून ओळखला जातो. हजारो वर्ष लोटली मात्र गीतेचे महत्व ‘जैसे थे’ आहे. गीतेतल्या ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. आज आपण गीतेबाबत काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात…

गीता संदेश काय? :
● विद्या प्राप्त करायाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या गोष्टी असल्या पाहिजे.
● आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे.
● आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण केले पाहिजे.
● जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगा.
● निस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे.
● क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते. स्मरण शक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो.

गीतेतील अध्याय आणि त्यांची नावे :
● 1 : अर्जुनविषादयोग
● 2 : सांख्ययोग
● 3 : कर्मयोग
● 4 : ज्ञानसंन्यासयोग
● 5 : कर्मसंन्यासयोग
● 6 : आत्मसंयमयोग
● 7 : ज्ञानविज्ञानयोग
● 8 : अक्षरब्रह्मयोग
● 9 : राजविद्याराजगुह्ययोग
● 10 : विभूतियोग
● 11 : विश्वरूपदर्शनयोग
● 12 : भक्तियोग
● 13 : क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
● 14 : गुणत्रयविभागयोग
● 15 : पुरुषोत्तमयोग
● 16 : दैवासुरसंपविभागयोग
● 17 : श्रद्धात्रयविभागयोग
● 18 : मोक्षसंन्यासयोग