Take a fresh look at your lifestyle.

“ह्यांच्या घरी पोर होईल का याचं उत्तर मी काय देणार?”

राज ठाकरेंच्या उत्तराने पिकला एकच हशा !

नाशिक : सध्या राज्यात आगामी काळात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे. त्यातच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक मानली जाते. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पत्रकार परीषदेत आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय?’ असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, ‘ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, याचे उत्तर मी कसे देऊ शकतो ?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये होते तेव्हा त्यांना का विचारला नाही असा प्रश्न? असं राज ठाकरे म्हणाले.तसेच, पुढे ते म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? ह्यांच्या घरी पोर होईल का याचं उत्तर मी काय देणार?” असे म्हणताच पत्रकारपरिषदेत एकच हशा पिकला.
तसेच यासोबतच गेल्या चार महिन्यांपासून गरीबाच्या घरात पगार नसल्याचे सांगत एसटीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.एसटी रस्त्यावर व्यवस्थित धावण्यासाठी एसटीच्या नियोजनासाठी एखाद्या चांगल्या कंपनीची गरज असल्याचेही राज यावेळी म्हणाले.