Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली !

'त्या' तक्रारीत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल.

 

 

पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणानंतर अखेर वादग्रस्त तहसिलदार देवरे यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे.

महिला अधिकारी म्हणून आमदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याकडून त्रास होत असल्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा महिला चौकशी समिती, विभागीय आयुक्त यांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवरे यांच्या बदलीचा आदेश शासनाने निर्गमित केला आहे.

[wp-embedder-pack width=”100%” height=”400px” download=”all” download-text=”” attachment_id=”572″ /]