Take a fresh look at your lifestyle.

लेक असावी तर अशी…मुलीचं बापावरचं प्रेम पाहा…!

अनेकजण तर अक्षरशा गहिवरले !

जळगाव : जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बाप-लेकीच्या प्रेमाची उदाहरण पाहून अनेकांना गहिवरून आलंय. त्याचे झाले असे की, सेवानिवृत्त जवान भागवत पाटील यांचे कोरोनाने अकाली निधन झाले. या परिस्थितीत त्यांच्या तिसर्‍या मुलीचा अर्थात प्रियंकाचा विवाह ठरला. 
अशात आपले वडील जगात नसले तरी ते आपल्या लग्नाला आलेच पाहिजे, ही प्रबळ भावना तिच्या मनात आली. मग तिने वडिलांचा पुतळा लग्नात ठेवत लग्नसमारंभ पार पडला. पाटील यांच्या चार मुलींपैकी दोनच मुलींचे लग्न झालेले आहे. त्यांना आपल्या तिसऱ्या मुलीचं लग्न देखील थाटामाटात करायचे होते. पण अचानक कुटूंबातून निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे वडिलांचा हुबेहूब पुतळा बनवून लग्न सोहळ्यात आणण्यात आला आणि हा एक चर्चेचा विषय बनला.
वडील आपल्यात असल्याची जाणीव व्हावी म्हणून दोन लाख किंमतीचा पुतळा बनवला गेला. त्यानंतर सर्व मुलींनी पाणावलेल्या डोळ्यांनी वडिलांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी मुलींचं वडिलांवरील प्रेम पाहून जमलेल्या सर्व पाहुण्यांना गहिवरुन आलं होतं.