Take a fresh look at your lifestyle.

पवार साहेबांनी वाढदिवसानिमित्त केली ‘अशी’ चिंता व्यक्त…

म्हणाले,देशासमोर असंख्य प्रश्न आहेत !

मुंबई : देशासमोर असंख्य प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचाचं कार्यकर्ता असला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त वरळीतील नेहरु सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

खा.पवार म्हणाले, बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट आहे आणि म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशासमोर आहेत. सामान्य लोकांच्या समोर आहेत. त्याच उत्तर शोधण्यासाठी आणि त्याची सुटका करण्यासाठी प्रभावीपणे काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता कोणता? हा निष्कर्ष लोकांनी काढताना तो राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतो, असे झाले पाहिजे.
समाजातील लहान घटकांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करायला पाहिजे अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.

दलित-उपेक्षित समाजातील लोकांवर जे अन्याय अत्याचार झाले त्याची अस्वस्थता त्यांच्यामध्ये आहे. ही दुरुस्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्या हे ऐकल्यानंतर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे. आदिवासी समाजातील तरुण आज अनेक अडचणी, नक्षलीझमचा त्रास सोसून आजची तरुण पिढी शिक्षित होण्यासाठी धडपडत आहे, पुढे जायचा विचार करत आहे. त्यांच्याशी राजकीय विचारधारेबाबत चर्चा केली तर ते सांगतील की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार मंजूर आहे.

या लोकांच्या जास्त काही अपेक्षा नाहीत या जगात आम्हाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे तो आम्हाला द्या एवढचं त्यांचं म्हणण आहे. त्यामुळं जो कार्यकर्ता अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखाशी समरस झाला नाही तो खरा कार्यकर्ता नाही, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.