Take a fresh look at your lifestyle.

‘या’ पद्धतीने घरबसल्या ईपीएफ ट्रान्सफर करा!

जाणून घ्या , सोपी पद्धत.

बहुतांश कंपन्या नोकरदाराच्या पगारातून कापलेला भाग पीएफ (PF) खात्यात जमा करते. शेवटी तुम्ही हवी तेव्हा ती रक्कम काढू शकता. मात्र नोकरी बदलली की नवीन संस्थेत नवीन पीएफ खातं उघडलं जातं. अशात जर तुम्ही तुमची सर्व रक्कम एकाच पीएफ खात्यात ट्रान्सफर करायचा विचार करत असाल, तर ही प्रक्रिया सोपी आहे. 

यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या टीप्स फॉलो करा.
● सर्वप्रथम EPFO पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ला भेट द्या.
● यानंतर, UAN क्रमांक (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करा.
● यानंतर, या वेबसाईटवर तुम्हाला ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’चा पर्याय दिसेल, यामध्ये तुम्हाला ‘एक सदस्य-एक ईपीएफ खातं (ट्रान्सफर रिक्वेस्ट)’ या पर्यायावर क्लिक करा.
● यानंतर वैयक्तिक माहिती भरून पीएफ खातं व्हेरिफाय करा.
● या प्रक्रियेनंतर तुम्हाला ‘गेट डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जुन्या कंपनीशी संबंधित माहिती दिसेल.
● प्रमाणित फॉर्मसाठी जुना एम्प्लॉयर किंवा सध्याचा एम्प्लॉयर यापैकी एक निवडा.
● यानंतर,‘Get OTP’ पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो सबमिट करा. या प्रक्रियायेनंतर, ईपीएफ ट्रान्सफर होईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO)नं स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे.