Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ठिकाणी भरते कोंबड्यांची जत्रा? 

एका दिवसात पडतात 30 ते 35 हजार बळी !

सिंधुदुर्ग :कोरोनामुळे गेल्या वर्षी सिंधुदुर्गातील जत्रांवर बंधनं आली होती. मात्र यंदा जत्रा मोठ्या उत्साहाने साजरी झालीय. कोकणा बरोबरचं महाराष्ट्रातील वेंगुर्ला हे कोंबड्यांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध आहे. या जत्रेची विशेष बाब म्हणजे येथील घोडेमुख देवाला कोंबड्याचा नवस केला जातो. एका दिवसात जवळपास 30 ते 35 हजार कोबड्यांचे बळी देण्याची परंपरा आहे. 
हे देवस्थान नवसाला पावणारं असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी आपला नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात.
या घोडेमुखला सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूर आदी भागातून भाविक डोंगर चढून देवाचे दर्शन घेऊन नवस फेडतात. मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे सुमारे 10 किलोमीटर पायपीट करून घोडेमुख मंदिर येथे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात होते. यानंतर गावकरी, मानकरी घोडेमुख देवस्थानाला भाविकांनी आणलेल्या कोंबड्यांचा मान देतात.