Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ बँक ग्राहकांना देते 2 लाखापर्यंतचा फ्री इन्शुरन्स !

नक्की जाणून घ्या या स्किमबद्दल !

 

नवी दिल्ली : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाचीच बातमी आहे. खरे तर, एसबीआय आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स देत आहे. बँकेच्या जनधन खातेधारकांना ही सुविधा देत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि डिपॉझिट खाती, क्रेडिट, इन्शुरन्स, पेन्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या पद्धतीने उपलब्ध करून देते.

बँकेकडून जन धन ग्राहकांना रुपे,जनधन कार्डची सुविधा दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत एक्सीडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता.ट्रान्सफर करण्याचा पर्यायही आहे.बेसिक सेव्हिंग अकाउंटला जन धन योजना

 

खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे रूपे कार्ड आहे, त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या कार्डसाठीची इन्सुरन्सची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत एक्सीडेंटल इन्शुरन्स कव्हर बेनिफिट उपलब्ध होईल.क्लेम कसा करायचा ते जाणून घ्या

या योजनेअंतर्गत वैयक्तिक पॉलिसीमध्ये भारताबाहेर घडलेल्या घटनेचाही समावेश आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर इन्शुरन्सच्या रकमेनुसार क्लेम भारतीय रुपयांमध्ये भरला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नॉमिनी होऊ शकतो.अशाप्रकारे खाते उघडा

जर तुम्हाला नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इत्यादी द्यावे लागतील.