Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ? कतरिनाच्या लग्नाच्या फोटोला 20 मिनिटांत मिळाले 10 लाख लाइक्स !

अभिनेता विकी कौशलने इंस्टाग्रामवर केले फोटो शेअर.

राजस्थान : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी नुकतीच रेशीमगाठ बांधली असून ते पवित्र विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला. कतरिना कैफ, विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 10 लाख लाइक्स मिळाल्या आहेत. विकी कौशलने नुकतेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले काही फोटो शेअर केले आहेत. 
विकी कौशलने फोटो शेअर करत लिहिले आहे,”आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागत आहोत”. विकी-कतरिनाच्या फोटोंवर चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कतरिना आणि विकी 12 डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही थाटात आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.
सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महलासमोरील मोकळ्या बागेत विकी कतरिनाच्या स्वप्नातील लग्नाचा मंडप उभारला गेला होता. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.
कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सवाई माधोपूरच्या जोधपूर स्वीट होमने लग्नसोहळ्यात मिठाई पाठवली होती. लग्नासाठी जोधपूरची प्रसिद्ध डिश ‘मावा कचोरी’ आणि बिकानेरची ‘गोंड पाक’ मिठाई पाठवण्यात आली होती. याशिवाय नाश्त्यामध्ये गुजराती ढोकळा, समोसा आणि कचोरी देण्यात आली.