Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मुळेच गोरेगावात एकाच दिवशी विक्रमी लसीकरण झाले शक्य !

ऑनलाइन नोंदीमुळे गर्दीही टळली.

 

पारनेर : तालुक्यातील गोरेगाव येथे एकाच दिवशी 560 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे विक्रमी लसीकरण शक्य झाल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी व्यक्त केले.स्वतः पूर्ण वेळ थांबून त्यांनी लसीकरण मोहिमेला त्यांनी गती दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य आण्णा पाटील नरसाळे,संपत नरसाळे,दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप तांबे,विकास काकडे,डॉ.भाग्यश्री उबाळे,वडेपल्ली सिस्टर,कडूस सिस्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे अनेक पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आले आहेत.संपुर्ण गावाला सुरक्षा कवच,औषध फवारणी,मास्क वाटप,उत्तम व्यवस्थापनाचा नमुना असणारे कोविड सेंटर गोरेगाव ग्रामपंचायत आणि बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या वतीने चालविले गेले.रेड अलर्ट वर असणारे गोरेगाव ग्रीन झोन मध्ये आणण्यात सरपंच सुमन तांबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अथक प्रयत्न होते.

ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,महसूल कर्मचारी,शिक्षक वर्ग,आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या सर्वांच्या एकसंघ कामामुळे गोरेगाव नियंत्रणात राहिले.

गोरेश्वर मंगल कार्यालय येथे लसीकरण करण्यात आले.त्याच वेळी 200 कोरोना चाचण्या देखील करण्यात आल्या. एकाच दिवशी लसीकरण होत असल्याने जि.प.शिक्षक आणि बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या युवक सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी साठी मदत केली.एक दिवस आधीच ग्रामपंचायत मार्फत नोंदणी करून लाभार्थ्यांना लसीकरणाची वेळ कळवली गेली.त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी टळली.12 टेबल वर एकाच वेळी ऑनलाईन नोंदणी होत असल्याने लसीकरणाला वेग आला.कुठलीही रांग न लावता सहजपणे लस मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.

लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अनिल पाटील नरसाळे,राम तांबे,रमेश नरसाळे,वैभव नरसाळे,लिपिक दयानंद खेनट,राजू पठाण,राजू गुढेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या वतीने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.पावसात देखील नागरिकांनी लसीकरण घेण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला,शांततेत लसीकरण यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे सरपंच सुमन तांबे यांनी आभार व्यक्त केले.