Take a fresh look at your lifestyle.

मला गर्लफ्रेंड पटेना म्हणत तरुणाचं आमदारांना पत्र!

सोशल मीडियावर होतय तुफान व्हायरलं.

 

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील एका तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुली भाव देत नसल्याने नाराज झालेल्या तरुणाने थेट आमदारानाचं पत्र लिहिलं आहे.

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, असं पठ्ठ्याने आमदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. चंद्रपूरच्या राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलंय. दरम्यान आमदार धोटे यांनी आपल्याला असे पत्र मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.

पत्रात काय लिहिले आहे? एकदा वाचा!  

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा

विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत

अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड

महोदय,

सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज फेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे. विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की, आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.

आपला प्रेमी

भूषण जांबुवंत राठोड