Take a fresh look at your lifestyle.

लोकांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं?

एकदा जाणून घ्याच!

2021 हे अत्यंत गडबडीचं वर्ष सरताना वर्षभरात जगातील नागरिकांनी गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं? याबाबत स्वत: गूगलने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. यामध्ये नेटकऱ्यांनी काही गोष्टी सर्वाधिक सर्च केलंय? त्याचा खुलासा करण्यात आला आहे. 
गूगलने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार सर्वाधिक सर्च हे कोरोना महामारीसंबधी आहेत. ज्यामध्ये, ‘पुन्हा लॉकडाऊन होईल का?’, कोरोनाची लस कुठे मिळेल अर्थात ‘व्हॅक्सीनेशन ड्राईव्ह’ यासह टोकियो ऑलिम्पिक्स, टी-20 विश्वचषक या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्या.
भारतातील सर्चचा विचार करता यामध्ये इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL), को-विन, युरो कप, आयसीसी टी-20 विश्वचषक, टोकियो ऑलिम्पिक्स या गोष्टी सर्च करण्यात आल्या. भारताने कोरोना महामारीसह खेळाच्या घडामोंडीबाबत मोठ्या प्रमाणात सर्च केल्याचे दिसत आहे.