Take a fresh look at your lifestyle.

ज्ञानदेव वाफारेंना महसूलमंत्री पाठीशी घालतात !

राजकीय दबावामुळे सर्वसामान्यांवर अन्याय.

अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे सन 2010 पासून 32 कोटी रुपये तसेच बनावट सोनेतारण 6 कोटी रुपये व शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल विभागाकडून केली जात नाही त्यामुळे ठेवीदारांवर मोठा अन्याय होत आहे. महसूलमंत्री वाफारे यांना पाठिशी घालत आहे त्यामुळे मंत्री महोदयांना देखील सहआरोपी करण्याची मागणी संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार संपदा पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करून आमच्या ठेवी व्याजासह परत करा या मागणीसाठी संपदा पतसंस्था ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले यावेळी धर्मनाथ पांडकर, संध्या खुळे, अॅड.अनिता दिघे,संतोष लांडे,चंद्रकांत खुळे, पृथ्वीराज मुनोत, अक्षय गांधी, सुरेखा म्हस्के, सुधीर काळे, दिलीप भट, अर्जुन अष्टेकर, माणिक कोंडे, रावसाहेब उगळे, शोभा चन्नर, विलास आहेर, जगन्नाथ झेंडे, राजेंद्र गांधी, बेबी म्हस्के, रमेश ससे तसेच आदी यावेळी उपस्थित होते.
आंदोलन प्रसंगी ठेवीदारांनी आरोप केला की, संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेसचे पुढारी असून सध्या ठेवीदारांचे पैसे बुडून वाफारे हा राजरोजपणे राजकिय पुढाऱ्यांसमवेत मिरवत आहे तसेच कर्जत नगरपालिकेचा पक्ष निरीक्षक म्हणून काम करीत आहे, महसूलमंत्री यांचा पाठिंबा वाफारेंना आहे. न्यायालयाचे लिलाव प्रक्रियेचे आदेश असतानाही तहसीलदार उमेश पाटील यांनी कुठल्याही प्रकारे लिलाव प्रक्रिया राबवली नाही उलट ठेवीदारांनी यांना विचारणा केली असता ते स्पष्टपणे सांगतात की, माझ्यावर राजकीय दबाव आहे.
यापूर्वी असलेले तहसीलदार अप्पासाहेब शिंदे हे ठेवीदारांच्या बाजूनी राहून कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया लढत ठेवीदारांना न्याय दिला परंतु तहसीलदार उमेश पाटील यांनी पुढील प्रक्रिया राबवली नसल्यामुळे ठेकेदारांवर अन्याय होत आहे असा आरोप ठेवीदारांनी यावेळी केला तसेच महसूलमंत्री नगर दौऱ्यावर आल्यावर त्यांना बांगड्यांचा आहेर ठेवीदार महिला देणार आहे.
जर प्रशासनाला राजकीय दबावामुळे न्यायालयीन प्रक्रिया राबवता येत नसेल तर न्यायालयीन बरखास्त करा व राजकीय पुढाऱ्यांच्या हातात न्यायालयीन प्रक्रिया द्या व सर्वसामान्यांना लुटा असा आरोप ठेवीदारांनी आंदोलन प्रसंगी केला.