Take a fresh look at your lifestyle.

शेणापासून बनवलेली चप्पलची एकदा पहाच!

या खास चप्पलबद्दल माहिती जाणून घेवू या.

शेणाची खास चप्पल छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये बनवली जात आहे. रायपूर येथील रितेश अग्रवाल या व्यक्तीने प्लॅस्टिकच्या चप्पलऐवजी शेणाचा वापर करून चप्पल बनवली आहे. चला, तर या खास चप्पलबद्दल माहिती जाणून घेऊया…
रितेश अग्रवाल यांच्या मते, देशात मोठ्या संख्येने गायी प्लास्टिक खाल्यामुळे त्याच्या वाईट परिणामांमुळे आजारी पडतात. अनेक गायींचा याचा प्लास्टिकमुळे बळी देखील गेलेला आहे. अशा परिस्थितीत प्लास्टिकचे उत्पादन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला हवे.

ही चप्पल बनवण्यासोबतच रितेश यांनी शेणाच्या साहाय्याने दिवे, विटा आणि देवाच्या मूर्ती देखील बनवतात. यामुळे एकूण 15 जणांना रोजगारही मिळतो. शेणाच्या चप्पलच्या एका जोडीची किंमत 400 रुपये आहे. या चप्पलचे वैशिष्ट्य म्हणजे 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतरही चप्पल खराब होत नाही.