Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 9,10 जूनला दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन !

प्रवक्ते नबाब मलिक यांची माहिती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, 10 जूनला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहे , लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे, देशात महागाई, धार्मिक भीती पसरवली जातेय, याबाबत देशात पर्याय तयार केला जाणार, भाजपविरोधात सगळ्यांना एकत्र करून ताकद उभारली जाणार, लोकांना पर्याय हवा आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली आहे. आगामी 5 राज्यांच्या निवडणुका, पक्षाची  संघटनात्मक बांधणी, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्यावर धोरण ठरवण्याबाबत बैठक होती. आगामी काळात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
कोविड काळात बेरोजगारी वाढली, व्यापार ठप्प झाला, लोकांना नुकसान झालं, महागाई वाढली यावरून आगामी काळात आंदोलन करणार असल्याचंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीत 5 राज्यांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशाबाबत अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. तसेच गोवा, मणिपूरबाबतही चर्चा झाली असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीही जोमाने उतरणार आहे.