Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून ‘हा’ दूर्मिळ फोटो आला सध्या चर्चेत !

पीडीसीसी बँकेची रणधुमाळी जुन्या आठवणी जाग्या.

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर 1949-50 साली शिरूर मधून माजी आमदार स्व.रावसाहेब दादा पवार यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळच्या संचालक मंडळाचा एक दुर्मिळ फोटो उपलब्ध झाला असून बँकेच्या जुन्या दगडी इमारतीच्या समोर हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढण्यात आला होता. सध्या बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून त्या पार्श्वभूमीवर हा फोटो चर्चेत आला आहे.
आता तब्बल 71 वर्षांनी ज्या बँकेत स्वर्गीय रावसाहेब दादा पवार यांनी संचालक मंडळावर काम केले त्याच बँकेवर जाण्यासाठी त्यांचे चिरंजीव शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार सरसावले आहेत. 1949-50 सालच्या या संचालक मंडळात त्यावेळी ग. र. तुळशीबागवाले बँकेचे अध्यक्ष होते तर पा. तु. वदक हे उपाध्यक्ष होते. स्व.रावसाहेब दादा यांच्यासह त्या वेळच्या संचालक मंडळात द. सो. टिळेकर, य. द. खोले, श्री. रा. पाळंदे, ध. रा. गाडगीळ, य. धो. ओगले, जी. बा. काळे, ज. द. वैद्य, स. य. बोरकर, कृ. बा. हुले पाटील, बा. ज. मोहीनी, वा. के. जोशी, शं. बा. इनामके, मा. धो. मगर, मो. वि. रबडे (मॅनेजिंग डायरेक्टर) आदींचा समावेश होता.
बँकेने आत्तापर्यंतच्या संचालक मंडळाचे फोटो जतन करून ठेवले असून सध्या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या जुन्या फोटोंना उजाळा मिळाला आहे. या रांगेत जाण्यासाठी आता आमदार अशोक पवार यांनी कंबर कसली असून गेली वर्षभर ते तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांची बँकेत ‘एन्ट्री’ होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.