अरे बापरे! गायीने दिला कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला जन्म !
'या' कारणामुळे लोक 'नैवेद्य' अर्पण करत आहे!
जग अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. असाच एक अनोखा कारनामा उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये पहायला मिळाला आहे. येथे एका गायीने चक्क कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला जन्म दिला आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. प्रत्येकजण हे वासरू पाहून आश्चर्यचकित होत होता. यानंतर याबाबत विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. काही लोक तर निसर्गाचा चमत्कार म्हणत नैवेद्य अर्पण करू लागले आहेत.
सविस्तर असे कि, पीलीभीत जिल्ह्याच्या बीसलपुर तालुक्यातील रामनगर जगतपुर गावात राहणार्या केदारी लाल यांच्या एका गायीने वासराला जन्म दिला. या वासराचे तोंड आणि उंची एखाद्या कुत्र्याच्या पिल्ला इतकीच होती. या वासराच्या जन्मानंतर घटनेची माहिती मिळताच लाल यांच्या घरी हळू-हळू लोकांनी गर्दी केली. आता काही लोक या वासराची पूजा करत आहेत.