Take a fresh look at your lifestyle.

लस घ्या अन् 50 हजारांचा मोबाईल जिंका !

'या' महापालिकेने लढवली अनोखी शक्कल !

गांधीनगर : कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी संपूर्ण लसीकरण वेगाने होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र काही नागरिक अजूनही लसीकरणासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमधील राजकोट महापालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे.
राजकोट महापालिकेने लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लकी ड्रा सुरु केला आहे. या लकी ड्रॉमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी मिळत आहे.
राजकोट महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. मात्र महापालिकेने यासाठी एक अटही ठेवली आहे.
या अटीनुसार कोरोनाचा दुसरा डोस 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान घेतलेला असणे गरजेचं आहे. यासाठी स्पेशल लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.