Take a fresh look at your lifestyle.

नाशिकच्या पोलिस अधीक्षकपदी जातेगावचे शहाजी उमाप !

करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून ख्याती.

 

 

शिरूर : नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षकपदी शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्त झालेले सचिन पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली.

श्री. उमाप मुंबई येथे व्हीआयपी सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे. सचिन पाटील यांची मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच वर्षभरात त्यांची बदली झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

श्री. उमाप हे पुणे जिल्ह्यातील जातेगाव (शिरूर) येथील आहेत. मुंबई पोलिस उपायुक्त पदी असताना उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना २०१९ मध्ये राष्ट्पती पदक जाहीर झाले. करडया शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी विविध ठिकाणी काम केले आहे. १९९६ नवी मुंबई येथे अतिरीक्त आयुक्तपदी असताना मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ते उपअधीक्षकांत पहिले आहे. २०१६ मध्ये ते भारतीय पोलिस सेवेत वर्ग झाले. त्यांनी आंबेजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले आहे.

पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कोल्हापूर व नांदेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. २०१२ मध्ये ते नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना २०१२ मध्य तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजाराहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली.