Take a fresh look at your lifestyle.

“त्या” निराधार मायलेकींना मिळाला मायेचा आधार !

भाळवणी : काही दिवसांपासून वेगाने वाहणाऱ्या वार्‍यामुळे हुडहुडी भरणारी थंडी आणि पाऊसाने मानसांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा या कडाक्याच्या थंडीत व पावसात गारठलेली एक निराधार मनोरुग्ण महिला दोन वर्षाच्या बाळासह भाळवणी येथील कापरी चौकात रस्त्यावर राहत असल्याचे अभिजित रोहकले यांच्या निदर्शनास आले. 
कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या या निराधार महिलेसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अभिजित रोहकले यांनी तातडीने या महिलेच्या निवाऱ्यासाठी धडपड करत पोलीस स्टेशनला संपर्क केला. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी कदम व अभिजित रोहकले यांनी अरणगाव येथील बेघर, निराधार पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या सेवाव्रतींना कळविले. काही वेळातच संस्थेचे स्वयंसेवक भाळवणी येथे पोहचवून निराधार महिलेला बालकासह ताब्यात घेतले आणि ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल केले.
कडाक्याच्या थंडी आणि पावसात राहणाऱ्या निराधार महिला व बालकांवरील संकट अभिजित रोहकले, संदिप खेनट, रावसाहेब साळवे, अशोक पोखरणा आणि भाळवणी ग्रामस्थांमुळे टळले.