Take a fresh look at your lifestyle.

संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी; 39 हजारांपर्यंत वेतन

डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट (DGDE), मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सmadhye ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, हिंदी टायपिस्ट आणि सब डिव्हिजनल ऑफिसरची अनेक पदं रिक्त आहेत. 
नोटिफिकेशननुसार ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी 7, सब डिव्हिजनल ऑफिसर पदांसाठी 89 आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी 89 पदांची भरती केली जाणार आहे.
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी उमेदवाराचं किंमान वय 18 आणि कमाल वय 30 असणं आवश्यक आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर आणि हिंदी टायपिस्टसाठी उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना 9,300 रुपये ते 34,800 + 4,200 रूपये ग्रेड पे असं वेतन दिलं जाईल. तर सब डिव्हिजनल ऑफिसर पदासाठी नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना 5,200 ते 20,200 + 2,400 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.
इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करता येईल. यासाठी त्यांना https://www.dgde.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.