Take a fresh look at your lifestyle.

आत्तापर्यंत ‘या’ खेळाडूंनी कसोटीच्या एकाच डावात 10 बळी घेतले आहेत! 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने ऐतिहासिक विक्रमला गवसणी घेतली आहे. त्याने एकाच डावात 10 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केलाय. 
अशाप्रकारे विक्रम करणारा तो जगातील केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी एजाजने 4 तर दुसऱ्या दिवशी 6 विकेट्स घेत एका डावात 10 विकेट्स घेण्याची किमया केली.
यासह त्याने इंग्लंडच्या जिम लेकर, भारताच्या अनिल कुंबळे यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहेत. एजाज पूर्वी केवळ या दोन गोलंदाजांनाचं एका डावात 10 बळी घेता आले आहेत.
● 1956 साली इंग्लंडच्या जिम लेकर यांनी 53 धावांत 10 बळी घेतले होते.
● 1999 साली भारताच्या अनिल कुंबळे यांनी 74 धावांत 10 बळी घेतले होते.
● आज 2021 रोजी न्यूझीलंडच्या एजाज पटेलने 119 धावांत 10 बळी घेतले आहेत.