Take a fresh look at your lifestyle.

भारतात ‘हे’ दमदार स्मार्टफोन होणार लॉंच, जाणून घ्या स्मार्टफोनबद्दल…

आता सर्व कंपन्यांनी नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच नवीन स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला, तर त्यावर एक नजर टाकूयात…   
शाओमी 12 : याच महिन्यात हा फोन लॉंच होणार आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर दिला जाईल. 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तर 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.
OnePlus 9RT : हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर दिला जाईल. 65W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेल Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला जाईल.
Moto G200 : पुढील महिन्यात हा फोन लाँच होईल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस दिला जाईल. 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाईल. तर 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Moto G51 5G : हा फोन याच महिण्यामध्ये भारतात लॉंच होईल. या फोनमध्ये Snapdragon 480+ प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन Zee स्मार्टफोन लाइनअपमध्ये येणारा पहिला 5जी स्मार्टफोन असेल, ज्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तर या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट दिला जाईल. 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
Micromax In Note 1 Pro : हा फोन पुढील महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये MediaTek Helio G90 प्रोसेसर दिला जाईल. तर 4 जीबी स्टोरेजबद्दल दिले जाईल. Android 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करेल.