Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 4 डिसेंबर 2021 

 

▪️मेष : महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल.
▪️वृषभ : कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
▪️मिथुन : विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ती सोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील. त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल.
▪️कर्क : दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल. जोडीदारासोबत फिरायला जाल.
▪️सिंह : तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल.
▪️कन्या : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल.
▪️तूळ : आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. दिवस आनंदात जाईल. आवडते पुस्तक वाचनात येईल.
▪️वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्‍यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
▪️धनू : थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
▪️मकर : नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा.
▪️कुंभ : धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. दानधर्म करता येईल.
▪️मीन : पैज जिंकता येईल. जुगारात लाभ संभवतो. पोटाच्या तक्रारी संभवतात. उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल.