Take a fresh look at your lifestyle.

अर्बन बँकेच्या ऊर्जितावस्थेसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करणार : अशोक कटारिया.

 

 

पारनेर : संपूर्ण राज्यामध्ये नगर अर्बन बँकेचा नावलौकिक असून या अर्बन बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी नवीन संचालक मंडळ विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक अशोक कटारिया यांनी दिली.
टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ, ढोकेश्वर पतसंस्था व पारनेर पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी अशोक कटारिया यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागुजी दादा झावरे, पाराजी वाळुंज, रामचंद्र पाटील रोकडे, हरीभाऊ दुधवडे,ढोकेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष विजय कटारिया, उपाध्यक्ष भाऊसाहेब लोंढे, मंडलाधिकारी शरद झावरे, व्यवस्थापक प्रशांत पायमोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उपाध्यक्ष सनी सोनावळे,सदस्य दादा भालेकर भिकाजी धुमाळ,स्वप्नील सोमवंशी,नवनाथ आंधळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कटरिया पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून बाजार समिती असो व अर्बन बँक किंवा पतसंस्था क्षेत्रात काम करत असून सहकारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु अर्बन बँकेचा जिल्ह्यात व राज्यात नावलौकिक असून आर्थिक अडचणीतून या बँकेला बाहेर काढण्यासाठी अवसयकांच्या मदतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
तर दुसरीकडे अर्बन बँकेचे गतवैभव लवकरच तिला प्राप्त करून देणार असल्याचे सूतोवाच सुद्धा अशोक कटारिया यांनी बोलून दाखवले.