Take a fresh look at your lifestyle.

आता नो टेन्शन : कार्डाशिवाय मिळणार रेशन !

पण यासाठी काय करावे लागणार,जाणून घ्या !

0

 

मुंबई : रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार देशातील अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन देत आहे. आता त्याच धर्तीवर, अनेक राज्यांमध्येही मोफत अन्नधान्य दिले जात आहे. याअंतर्गत, दिल्ली-एनसीआरमध्येही ‘वन नेशन वन रेशन कार्ड योजना’ लागू झाल्यानंतर, इतर राज्यांतील लोकांनाही मोफत रेशन मिळू लागले आहे.

याशिवाय, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंडमध्ये आधीपासून रेशन कार्ड नसतानाही रेशन मोफत दिले जात आहे. परंतु काही लोकांना रेशन कार्डशिवाय धान्य मिळत आहे ही, गोष्ट तुम्हाला माहित नसेल. परंतु तुम्ही आता विना रेशन कार्ड देखील धान्य मिळवू शकता.

▪️रेशन कार्डवर काम जोरात सुरू.

यासह, देशातील नवीन रेशन कार्ड्स सोबत, जुन्या रेशन कार्ड मध्ये नावे जोडणे आणि हटवण्याचे काम देखील सरकारकडू सुरू करण्यात आले आहे, परंतु यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार किंवा बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये निलंबित कार्ड सध्या जोडले गेले आहेत.

▪️एक राष्ट्र एक रेशन कार्ड

दिल्ली सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वितरण आता सर्व ई-पीओएसद्वारे लागू केले जात आहे. आता या अंतर्गत लाभार्थींना कार्डशिवाय मोफत रेशन मिळू शकेल. पण यासाठी तुमचे कार्ड आधार किंवा बँकेशी लिंक करणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त, दिल्ली सरकारने ही सुविधा दिली आहे की, जर तुमचे आरोग्य चांगले नसेल किंवा काही कारणामुळे तुम्ही रेशन दुकानात जाऊ शकत नसाल तर तुमच्या जागेवर म्हणजेच तुमच्या कार्डावर इतर कोणतेही रेशन घेऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.