Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या तहसीलदारपदी शिवकुमार आवळकंठे !

सोमवारी पदभार स्विकारणार.

पारनेर : वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीनंतर अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या तहसीलदार पदावर अखेर शिवकुमार आवळकंठे यांची नियुक्ती झाल्याने आता तालुक्याला पूर्णवेळ तहसिलदार उपलब्ध होणार आहेत.
श्री.आवळकंठे हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते.ते सोमवारी पारनेरच्या तहसिलदार पदाचा पदभार स्विकारणार असल्याची माहिती आहे.
तालुक्याच्या तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे यांची वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर पारनेरच्या तहसीलदारपदाचा पदभार काही काळ नायब तहसीलदार व त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तात्पुरता सोपविण्यात आला होता. 
पारनेरला तालुक्याला गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार उपलब्ध नव्हते.पारनेरच्या तहसीदारपदी शिवकुमार आवळकंठे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने बदलीच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्याने ही नियुक्ती रखडली होती.

त्याळेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदाभार दिला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सदरच्या आदेशावर सही केल्यानंतर गुरूवारी राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी तहसीलदार आवळकंठे यांच्या नियुक्तीचा आदेश निर्गमित केला. हा आदेश नाशिक आयुक्तालय, नाशिक जिल्हाधिकारी तसेच अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. तहसीलदार आवळकंठे सोमवारी पदभार स्विकारणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.