Take a fresh look at your lifestyle.

ओमायक्रॉनपासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी सांगितले ‘हे’ उपाय !

तर मग नक्की जाणून घ्याच !

 

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन पोहोचला आहे. हा प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकायक आहे. त्यामुळे यापासून कसे वाचायचे? त्यासाठी काय-काय उपाय करायचे? याविषयी प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.
यादरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ अँथनी फौसी यांनी ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. चला, तर त्याविषयी जाणून घेऊयात…
● कोरोना लसीचे दोन्ही दोन घ्या. ज्यामुळे याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
● नियमित मास्कचा वापर करा. ज्यामुळे आपण या रोगाला हरवू शकतो.

● शक्यतो गर्दीत जाणं टाळा, गरज असेल तरच गर्दीच्या ठिकाणी जा.
● काहीही झाले तरी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा
● संक्रमणाची लक्षणे दिसल्यास कोरोना टेस्ट करुन घ्या.
● जर कोरोनची कोणतीही लक्षणे आढळली तर स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवा.
वरील काही उपाय तुम्हाला ओमायक्रॉनपासून बचावासाठी नक्कीच मदत करतील.