Take a fresh look at your lifestyle.

सभापती गणेश शेळके यांनी पदाला न्याय दिला !

कुरुंद येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण.

पारनेर : पंचायत समिती सदस्यपदी दोन वेळा मिळालेली संधी यामध्ये सभापती पदाचा मिळालेला दोन वेळा कार्यभार यात वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक कामांच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवुन सभापती गणेश शेळके यांनी सभापती पदाला न्याय दिला असे मत जिल्हा परिषदेचे जलसंधारण व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कुरूंद येथे पंचायत समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे पाटील म्हणाले की,सभापती गणेश शेळके यांनी सुपा गटासह तालुक्यात विविध योजना राबवत विकास कामे केली आहेत. पंचायत समितीच्या विविध योजनेतुन तालुक्यातील अनेक गावांमध्ये निधी देण्यात आला तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पही अनेक गावांमध्ये देण्यात आले आहेत.पंचायत समिती स्तरावरील विविध योजनांचा अभ्यास करत सदर योजना गावागावांमध्ये राबवल्या या योजना राबविल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावले आहे.
या प्रसंगी सरपंच गणेश मधे, उपसरपंच संतोष कारखिले, रमेश गायकवाड सर, अशोक कर्डिले सर, दशरथ शेठ कुलाळ, कैलास कोठावळे, चेतन उबाळे, विकास रुपनर, आनंदा भोसले, सुरेश ढेरंगे, दत्ता शेंडगे, बापू खेमनर, भाऊसाहेब शिंदे, दत्ता चौधरी, दिपक उबाळे, रमेश गव्हाणे, गोपी कांबळे, उबाळे चेअरमन, शिवानी चौधरी,निलेश शेंडगे पांडुरंग शिंदे, ओंकार मावळे, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती गणेश शेळके यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी पुर्ण केली. प्रसिद्धीचा हव्यास न करता प्रत्यक्ष कामे शेळके यांनी गटात मार्गी लावली त्यामुळे कामे करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी नागरिकांनी सतत उभे राहिले पाहिजे अशा भावना कुरुंद ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
पंचायत समितीच्या माध्यमातून मला दोन वेळा सभापती हे पद मिळाले या पदावर काम करताना आपण कसलेही गटा तटाचे राजकारण न करता तालुक्यात व सुपा गटात गाव विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. या पुढे ही लोकांच्या कामांना प्राधान्य देणार.
गणेश शेळके ,सभापती