Take a fresh look at your lifestyle.

पारनेर शहरातील १२ प्रमुख रस्त्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी !

आ‌मदार निलेश लंके निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची मतदारांना अनोखी भेट

 

पारनेर : गेल्या अनेक वर्षापासून पारनेर शहरातील वाड्या-वस्त्यांवरील १२ प्रमुख रस्त्यांसाठी नगरविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही मतदारांना अनोखी भेट मानली जात आहे. तर दुसरीकडे या १२ प्रमुख रस्त्यांमध्ये कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण रस्त्यांचा समावेश असुन अनेक वर्षापासून मागणी या निमित्ताने पूर्ण झाली असल्याचे डाॅक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे,नगरसेवक नंदकुमार औटी यांनी सांगितले.
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विभागांतर्गत पारनेर नगरपंचायत हद्दीतील खालील विविध विकासकामासाठी ३ कोटींचा रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र.१४ मधील पानोली रोड ते लमाण बाबा मंदिर रस्ता काँकिटीकरणासाठी -६० लक्ष प्रभाग क्र.१४ मधील पानोली रस्ता ते विमल औटी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी -१६ लक्ष प्रभाग क्र.१४ मधील पानोली रस्ता ते भास्कर औटी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रेटीकरणासाठी-१६ लक्ष प्रभाग क्र.१४ मधील ठोंबरे वस्ती ते खोसे वस्ती रस्ता काँक्रेटीकरणासाठी- ५० लक्ष प्रभाग क्र.१४ मधील सिद्धेश्वर वाडी रस्ता ते दर्शन औटी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी- २० लक्ष प्रभाग क्र.१४ मधील पानोली रस्ता ते शिवाजी पानसरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रेटीकरणासाठी- १२ लक्ष प्रभाग क्र.१४ मधील जुनी पंचायत समिती ते विजय दावभट यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रेटीकरणासाठी-

२५ लक्षप्रभाग क्र.१४ मधील कुर्नाडी वस्ती ते अशोक औटी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रेटीकरणासाठी-
२५ लक्ष प्रभाग क्र.१४ मधील सिद्धेश्वरवाडी ते संकेत ठाणगे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी-
१२ लक्ष प्रभाग क्र.१२ मधील पारनेरकर महाराज सभागृह ते नागेश्वर मंदिर रस्ता काँक्रेटीकरणासाठी-
२० लक्षप्रभाग क्र.७ मधील मनकर्णिका विहीर ते शनी मंदिर रस्ता ( वरची वेस ) काँक्रेटीकरणासाठी-
२५ लक्ष प्रभाग क्र. १ मधील कान्हूर रोड ते कुंभारदरा रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पारनेर ग्रामपंचायत असल्यापासून या वाड्या वस्तीवरील नागरिकांनी वेळोवेळी डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी केली होती. तर दुसरीकडे दळणवळणासाठी ही रस्तांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी नगरविकास खात्याकडे १२ रस्त्यांसाठी भरून निधीची मागणी केली होती. त्यानुसार या १२ रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या निधीमुळे 12 रस्त्यांची दुरवस्था हटली असल्याचे निलेश लंके युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्योजक विजय औटी यांनी सांगितले