आमदार निलेश लंके धावले मेंढपाळांच्या मदतीला ! धनगर वाड्याला भेट ;आर्थिक मदतीचे आश्वासन.
पारनेर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी व गारठ्यामुळे मेंढपाळ समाजाच्या पाचशेच्यावर मेंढ्या मृत्यू झाल्याची शक्यता आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली असून तातडीने यासंबंधी ते पंचनामे करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत व या नुकसानग्रस्त मेंढपाळ बांधवांना शासन दरबारी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी या भेटीदरम्यान दिले आहे.
तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान मेंढपाळ समाजाचे झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या समाजाला जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याच्या या भेटीदरम्यान दिले आहे.
यावेळी मंडलाधिकारी सचिन पोटे,तलाठी स्वप्नील गोरे उपस्थित होते.
गुरुवारी दुपारच्या सुमारास आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील मुंगशी व पुणेवाडी येथील अतिवृष्टीमुळे गारठ्यामुळे मेढयांचा मृत्यू झालेल्या धनगर समाजाच्या वाड्यावर भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यामुळे या अतिवृष्टी पासून व गारठा पासून बचाव करण्यासाठी गावात असणारे सभामंडप किंवा शासकीय जागा यांचा आसरा धनगर व मेंढपाळ बांधवांनी घ्यावा व गावकऱ्यांनी त्यांना आसरा द्यावा असे भावनिक आवाहन आ.लंके यांनी केले आहे.
टाकळी ढोकेश्वर अळकुटी, देवीभोयरे, लोणीमावळा, पाबळ, खडकवाडी या ठिकाणी जाऊन तेथील नुकसान ग्रस्त मेंढपाळ बांधवांच्या भेटी घेतल्या. त्यांना आधार देऊन संबधित पशुसंवर्धन अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून पंचनामा करण्यास आमदार निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून सूचना केल्या. खऱ्या अर्थाने पारनेर तालुका जसा शिक्षकांची खाण आहे, त्याप्रमाणेच मेंढपाळांची सुध्दा ढवळपुरी पंढरी समजली जात आहे. त्यामुळे मेंढपाळ हा जपला गेला पाहिजे. त्या अर्थानेच आमदार श्री निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते श्री निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.परंतु शासनाने मेंढपाळ बांधवांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात याव्यात. त्यांना ज्या गावात जात आहे, त्या भागातील असणारे निवारा गृह खुले करावे. जेथे नसतील तेथे नव्याने उभारण्यात यावे.
▪️गणेश आप्पा हाके
अध्यक्ष, लोकनेते निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य.
पारनेर तालुक्यातील अनेक धनगर बांधव भटकंती करण्यासाठी बाहेर जिल्हयात गेले असून त्यांनी सुद्धा आपली काळजी घेऊन सभामंडपास असो किंवा शासकीय जागा असो या ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी यावेळी केली आहे. तरी या अतिवृष्टी व गारठ्यामध्ये मेंढपाळ समाजाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासन दरबारी यासंबंधी मदत मिळण्यासाठी विशेष पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार लंके यांनी यावेळी धनगर बांधवांना दिले आहे.
अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. विशेष करून पारनेर, नगर, राहुरी, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात जास्त घटना घडल्या आहेत. शासकीय अधिकारी पंचनामे करत आहेत परंतु मदत त्वरित मिळणे गरजेचे आहे.
मेंढपाळ बांधवांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना ही नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान झाले आहे. या परिस्थितीत मेंढपाळ बांधवांना मरण पावलेल्या प्रती मेंढी पाच हजार रुपये त्वरीत मदत द्यावी व उरलेली रक्कम सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळावी. अन्यथा मेंढपाळ पुर्ण कोलमडून जाईल तरी या आपण लवकरात लवकर राज्य सरकारने मदत जाहीर करावी.
इंजि.डी.आर.शेंडगे