Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे थीम साँग : ‘महाराष्ट्राची शान’ !

शरद पवारांच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित.

 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश विभागाच्या वतीने ‘ महाराष्ट्राची शान’ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन सॉंग तयार करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक सचिव मंगेश मोरे यांनी त्यांच्या सप्तसूर म्युझिक कंपनीच्या माध्यमातून या गाण्याची निर्मिती केली आहे.
नुकतेच पुण्यात एका स्टुडिओत या गाण्याचे रिकॉर्डींग पूर्ण झाले असून येत्या १२ डिसेंबरला म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंगेश मोरे यांनी दिली.हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी रेकॉर्डिंगला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः ही गाण्याचे काही बोल गायले.
यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट साहित्य व संस्कृती विभागातील अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुंबई शहर उपाध्यक्षा लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अभिनेत्री सुरेखा कुडची, संगीतकार डॉ. आशिष मोरे, गीतकार प्रशांत मडपूवार पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमरशेठ गवळी, शहर उपाध्यक्ष निलेश घुले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कदम, शहर उपाध्यक्ष राजेंद्र आलम खाणे आदीजण उपस्थित होते.शहर उपाध्यक्ष राजेंद्र आलम खाणे आदीजण उपस्थित होते.

प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलं असून डॉ. आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रशांत मडपूवार हे या गाण्याचे गीतकार आहेत, तर मंगेश मोरे प्रोडक्शन सप्तसूर म्युझिक कंपनी ही या गाण्याची निर्माती केली आहे.