Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 2 डिसेंबर 2021

 

▪️मेष : आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.
▪️वृषभ : आविद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल.
▪️मिथुन : घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.
▪️कर्क : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका. तुमचा मान वाढेल.
▪️सिंह : व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
▪️कन्या : कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आज मानसिक सौख्य लाभेल.
▪️तूळ : खरेदीचा मनापासून आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल. अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
▪️वृश्चिक : आज प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल. मानसिक चंचलता जाणवेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.
▪️धनू : नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.
▪️मकर : थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.
▪️कुंभ : गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. पोटाचे विकार संभवतात. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
▪️मीन : जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी. मानसिक चंचलता जाणवेल.