Take a fresh look at your lifestyle.

सुप्रिया झावरे पाटील यांनी ‘शब्द’ पाळला !

पारनेर : दैठणे गुंजाळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद,सदस्या सुप्रिया वसंतराव झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.गेले अनेक वर्षांपासून सदर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालाय नसल्याने ग्रामस्थांचे नागरिकांना शासकीय कामे होण्यास गैरसोय होत होती.
सन २०१८-१९ मध्ये तत्कालीन सरपंच व सर्व सदस्य यांनी सुजित झावरे पाटील तसेच सुप्रियाताई झावरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन १८-१९ च्या आर्थिक नियोजनातून २५/१५ या योजने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांनी सदर ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी मंजूर करून दिला आहे. सदर ग्रामपंचायत इमारत बांधून पूर्ण झालेली असून जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे पाटील यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय इमारत झाल्याने ग्रामस्थांनी सुप्रिया झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच आश्विनीताई केदार, माजी सरपंच साहेबराव गुंजाळ, उपसरपंच सचिन गुंजाळ, माजी सरपंच अंबादास जाधव, चेअरमन भाऊसाहेब येवले, ग्रामपंचायत सदस्या जया पोपट जासुद, उज्वला आग्रे, संजय येवले, बाबुराव भुजबळ, शिवराम गुंजाळ, अशोक केदार, काकासाहेब गुंजाळ, संभाजी गुंजाळ , पोपट जासुद , ग्रामसेवक बी.जे.पवार, सभाजी येवले, जयसिंग गुंजाळ, शिवाजी कळमकर,आर.एम .झांबरे तसेच गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.