Take a fresh look at your lifestyle.

हो, ‘या’ गावात लग्नं होत नाहीत; सर्व तरुण अविवाहितच! 

2011 साली झाल होत शेवटचं लग्न !

 

 

आपल्या भारतामध्ये सध्या एक असे गाव आहे जेथे सर्व तरुण अविवाहित आहेत. नक्की गाव कोणते? या गावात अशी परिस्थिती का निर्माण झाली? याबद्दल आज अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

झारखंडची राजधानी रांचीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये सर्व तरुण अविवाहित आहेत. त्याचे कारण असे कि मूलभूत पायाभूत सुविधादेखील नसल्यामुळे या भागात एकही मुलगी लग्न करायला तयार नाही.

रांचीपाशी असणाऱ्या कोनकी पंचायत या भागातील आदिवासी भागात जाण्यासाठी साधा पूल देखील नाही. या भागात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते.

पावसाळ्यात येथील नदीला पूर आला की, बाहेरून गावात जाता येत नाही आणि बाहेर पडताही येत नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता या गावात गेल्या अनेक वर्षांपासून लग्न सुद्धा झालेलं नाही. गावातील अनेक तरुणांची लग्नाचं वयं उलटून देखील त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही.

2011 साली या गावात शेवटचं लग्न झालं होतं. हेसा नाग नावाच्या तरुणीनं या गावातील एका तरुणाशी लग्न केलं होतं. या भागात जाण्यायेण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात कोणाची तब्येत बिघडली, तर त्याला वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने आमच्या मूलभूत समस्येकडे लक्ष देऊन किमान एक पूल बांधावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहे.