Take a fresh look at your lifestyle.

उंचीने लहान, पण कर्तृत्वाने महान महिला वकील!  

24 वर्षीय हरविंदरची उंची आहे फक्त 'एवढीच' !

भारतातील उंचीने सर्वात लहान असणारी वकील हरविंदर कौर सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. याचे कारण तिची उंची नव्हे तर इच्छाशक्ती आहे. 24 वर्षीय हरविंदरची उंची 3 फूट 11 इंच असून ती जालिंधर सेशन कोर्टामध्ये वकील म्हणून काम करते.
हरविंदर तीन वर्षांची झाली तेव्हापासूनच तिची उंची वाढण्याचं बंद झालं. बाकीच्या मुलांच्या तुलनेत तिची उंची लहान राहिल्याने तिला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. याचा तिच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. मग तिने शाळेत जाणे बंद केले. पण तिनेखचून न जात आपल्यासारख्या डिसेबल मुलांच्या हक्कासाठी लढण्या नक्की केले. त्यानुसार तिने आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की, मी शाळेत आपल्या मित्र मैत्रिणींकडून सहन कराव्या लागलेल्या टॉर्चरमुळे दुखावले गेले हाेते. माझ्यासारखे बरेच लोक या देशांमध्ये असून त्या सर्वांसाठी मी लढण्यासाठीच वकिलीचे शिक्षण घेतलेय.
अगदी आत्ताही जेव्हा ती कोर्टमध्ये जाते तेव्हा लोक तिच्या उंचीबद्दल कुजबुज करतात. मात्र आता ती अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. कारण निसर्गातः मिळालेल्या गोष्टींचा तिने स्वीकार केलाय.