Take a fresh look at your lifestyle.

विश्वासघातकी आणि बदनाम लोकांकडून बाजार समितीच्या बदनामीचा डाव !

विरोधकांचे आरोप बिनबुडाचेच : सभापती अभिलाष घिगे.

 

नगर : ज्या लोकांनी स्वतःच्या नेत्यांना, पक्षाला आणि कार्यकत्यांना फसवले, पाठीत खंजीर खुपसला अशा विश्वासघातकी आणि बदनाम लोकांकडून नगर बाजार समितीला बदनाम केले जात असल्याचे सांगत बाजार समितीवर आजवर अनेक आरोप झाले, चौकशा लागल्या पण प्रत्येक वेळी बाजार समिती निर्दोष सिद्ध झाली. आणि यावेळीही होईल. राजकीय आणि सरकारच्या दबावाखाली ही नोटीस ठविण्यात आली असून त्यास योग्य आणि कायदेशीर उत्तर दिले जाईल असे मा. खा. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

नगर तालुका महाविकास आघाडीने बाजार समितीवर केलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी आयोजित पत्रकारपरिषदेत सभापती घिगे, उपसभापती म्हस्के यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी बोलताना ते म्हणाले की,महाआघाडीतील जे लोक बाजार समितीवर आरोप करत आहेत त्यांची विश्वासाहर्ता काय आहे. संदेश कार्ले शेतकरी हिताचा आव आणतात त्याच कार्ले यांनी स्वतः च्या स्वार्थापोटी जिल्हा परिषद विषय समिती पदासाठी त्यांनी प्रा. गाडे यांचा आदेश मानला नाही. तालुका शिवसेना ताब्यात घेऊन हुकूमशाही करतात असे शिवसैनिक आम्हाला सांगतात. त्यांना जिल्हा प्रमुख आणि आमदार होण्याची घाई झाली आहे. आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्याच पक्षातील अनेकांचे खच्चीकरण केले पदाचा आणि पक्षाचा वापर फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी केला. विधान परिषद वेळी पक्षाशी नेत्यांशी गद्दारी करत कितीची पाकिटे घेतली आणि मतदान कोठे केले हे सांगितल्यास जनता यांना दारात उभी करणार नाही असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब हराळ तर प्रत्येक निवडणुकीत आपला नेता बदलतात. ज्या दादा पाटील शेळके यांनी जीवाचे रान करत हराळांना निवडुन आणले, पण मतमोजणीच्या रात्रीच ते विखे पाटलांच्या गटात सामील झाले. विधान परिषदेत त्यांनी प्रा. गाडे यांना मतदान केले का ? हे शपथ घेऊन सांगावे. असे आवाहन देत ते कोणत्या पक्षात आहेत आणि त्यांचा नेता कोण हे त्यांनाच सांगता येणार नाही. त्यामुळेच गुंडेगावच्या लोकांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये त्यांचे पार्सल नगरला पाठवले आहे. याच हराळ यांनी 1 महिन्यांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती त्यावेळी आम्ही मंत्र्यांना भेटलो, प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे सांगितले होते.नोटीस हा त्या पूर्व नियोजित कटाचा भाग असल्याचे घिगे म्हणाले.

गोविंद मोकाटे यांना मानोसोपचार तज्ञाची गरज आहे. कायदा त्यांना समजतो की नाही ते माहिती नाही. महाआघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी किती कार्यकर्त्यांना कामे दिली, रोजी रोटी दिली ते जनतेसमोर येऊन सांगावे. स्वतः हे सर्व ठेकेदारी करतात आणि जनतेच्या हिताचा आव आणतात. महाआघाडी चे नेते म्हणणारे अनेक जण छुप्या पध्दतीने माजी मंत्री यांच्याशी येऊन भेटतात आघाडीच्या या नेत्यांचा खरा चेहरा, कार्यकर्त्यांना आणि लोकांना समजला आहे. त्यांचेच कार्यकर्ते आमचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला गेला उघड पणे बोलू लागले आहेत. त्यामुळे स्वतःचा विश्वासघातकी पणा आणि बदनामी झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बाजार समितीला बदनाम करत आहेत.

बाजार समितीमध्ये वातावरण तापवायचे सर्वसामान्य कार्यकत्यांना उभे करायचे आणि अखेरच्या टप्प्यात हातचा राखून काम करत पॅनल पाडायचा कारण कोणी दुसर नेतृत्व तयार होऊ नये म्हणून आणि सांत्वन करायला निवडणुकीत करून घ्यायचा ही या लोकांची करणी आता उघड होऊ लागली आहे. मागील बाजार समितीमधील पराभूत उमेदवार आम्हाला भेटून हे सांगत आहेत. राज्यात सत्तेवर असल्याने सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोपही सभापती घिगे, उपसभापती म्हस्के यांनी केला.

बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषद वेळी सभापती अभिलाष घिगे,उपसभापती संतोष म्हस्के, संचालक रेवणनाथ चोभे,हरिभाऊ कर्डीले, विलास शिंदे, बाळासाहेब निमसे, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, दिलीप भालसिंग, बबन आव्हाड, बाळासाहेब जाधव, संतोष कुलट, उद्धव कांबळे,भैरू कोतकर,वसंत सोनवणे आदी उपस्थित होते.