Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 28 नोव्हेंबर 2021 

 

▪️मेष : आज मित्रांची साथ मिळेल. पत्नीच्या बाजूने चांगली साथ मिळेल. आज नशीबाची चांगली साथ मिळेल. कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका.
▪️वृषभ : प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आज समारंभासाठी आमंत्रण येईल. आज धावपळीमुळे थकवा जाणवेल. महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकाल.
▪️मिथुन : देवावरील विश्वास दृढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. सामाजिक कामात अडथळा येऊ शकतो.
▪️कर्क : मुलांवरील विश्वास दृढ होईल. दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. मेहनतीचे गोड मिळेल.
▪️सिंह : बोलण्यात गोडवा असावा. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल. इतरांशी असणारे संबंध जपावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
▪️कन्या : वडीलांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेऊ शकतात. हातातील कामे न डगमगता कराल.
▪️तूळ : नात्यात गोडवा निर्माण होईल. इतरांच्या आनंदाचा विचार कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्हाला मनाजोगी फळे मिळतील.
▪️वृश्चिक : हितशत्रूंवर जय मिळवाल. संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील. व्यावसायिक प्रश्न सोडवता येतील.
▪️धनू : आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाचे विकार जाणवतील. आहारवर संयम ठेवा. तुमच्या ज्ञानात भर पडेल. आवड जोपासता येईल.
▪️मकर : नातेवाईक तुमचा आदर करतील. सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. नवीन कामात गुंतवणूक कराल. नावडते लोक सामोरे येतील.
▪️कुंभ : कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नोकरांचे सुखं लाभेल. जवळचा प्रवास घडेल. केलेला खर्च फायदेशीर ठरेल.
▪️मीन : आनंदी लोकांचा सहवास लाभेल. तुमचे मनोबल वाढेल. वाहवत जाऊ नका. सामाजिक सन्मानात वाढ होईल.