Take a fresh look at your lifestyle.

वकिलाची लग्नपत्रिका पाहून म्हणाल, वाह भाई वाह…!

 

प्रत्येकजण आपले लग्न खास आणि त्यातील क्षण कायमचे आठवणीत राहावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे मार्गही अवलंबतात. सध्या सोशल मीडियात एका वकिलाची लग्न पत्रिका व्हायरल होत आहे. ती पत्रिका वाचून तुम्ही हैराण व्हाल एवढं नक्की!

ही लग्नपत्रिका आहे गुवाहाटी, आसाम येथील एका वकिलाच्या लग्नाची. या जोडप्याने त्यांच्या खास दिवसासाठी संविधान-थीम असलेली छापली आहे. कार्डमध्ये समानता दर्शवण्यासाठी वधू आणि वरांची नावे न्यायाच्या तराजूच्या दोन्ही बाजूला लिहिली गेली आहेत. तर आमंत्रणात भारतीय विवाहांना नियंत्रित करणारे कायदे आणि अधिकार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

लग्नपत्रिकेवर काय लिहिले आहे? : “विवाहाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकाराचा एक घटक आहे. त्यामुळे माझ्यासाठी रविवार, 28 नोव्हेंबर 2021 रोजी या मूलभूत अधिकाराचा वापर करण्याची वेळ आलीय. जेव्हा वकील लग्न करतात तेव्हा ते ‘हो’ म्हणत नाहीत, ते म्हणतात, ‘आम्हाला अटी व शर्ती मान्य आहेत’.

संविधानावर आधारित लग्नपत्रिका सोशल मीडियावर पाहून लोक गंमतशीर प्रतिक्रिया देत आहेत.