Take a fresh look at your lifestyle.

राळेगणसिध्दीच्या सरपंचपदी लाभेष औटी !

वीजेच्या बाबत परिसर स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार

पारनेर : तालुक्यातील राळेगणसिद्धीसह परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना व्यक्त केला.
आदर्शगाव राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटी यांची बिनविरोध निवड आज (शुक्रवारी ) करण्यात आली. औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी उर्फ नाना यांना संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे सरपंच म्हणून ओळखले जात होते. तसेच ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते.
विद्यमान सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडीसाठी मंडलाधिकारी आर. आर. कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली होती.
यावेळी सरपंच पदासाठी लाभेष औटी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडलाधिकारी आर.आर कोळी यांनी जाहीर केले. या निवडीसाठी तलाठी अशोक डोळस, ग्रामसेवक वैशाली भगत, भाऊसाहेब पोटघन आदींनी मदत केली.यावेळी उपसरपंच अनिल मापारी, माजी सरपंच डॉ. धनंजय पोटे, जयसिंग मापारी, मंगल मापारी, ग्रामपंचायत सदस्य सुनिता गाजरे, स्नेहल फटांगडे, मंगल उगले, मंगल पठारे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी उद्योजक सुरेश पठारे, व्हा. चेअरमन दादा पठारे, सुनिल हजारे, रमेश औटी, विठ्ठल गाजरे, उद्योजक जयसिंग मापारी, किसन पठारे, शरद मापारी, पोपट औटी, बाळासाहेब पठारे, कांतीलाल औटी, संतोष औटी, भाऊसाहेब मापारी, एकनाथ मापारी, शरद पठारे, अक्षय पठारे, प्रविण पठारे, आकाश पठारे, अरूण पठारे, दादाभाऊ गाजरे, दादाभाऊ पठारे, किसन मापारी, गोरख मापारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन यापुढे ग्रामविकासाचे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
संपूर्ण राळेगणसिद्धी व परिसर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. लवकरच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली २५ मेगावॅट प्रकल्प उभा करणार असून यापुढील काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही समस्या जाणवणार नाही. तसेच ४० बेडच्या रुग्णालयाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीसह परिसरातील सर्वांचे आरोग्याचे प्रश्न सुटतील.
▪️लाभेष औटी.
नवनिर्वाचित सरपंच राळेगणसिद्धी