Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 26 नोव्हेंबर 2021 

 

▪️मेष : वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे.
▪️वृषभ : नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.
▪️मिथुन : मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनुभव हाच गुरु हे लक्षात घ्या. काही अनपेक्षित लाभ मिळतील.
▪️कर्क : जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
▪️सिंह : अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल. प्रेम जीवनात जवळीक साधता येईल.
▪️कन्या : मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल. कौटुंबिक आनंद साधता येईल.
▪️तूळ : घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल. दूरची प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो.
▪️वृश्चिक : मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल.
▪️धनू : नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील. एखादी भेट वस्तु मिळेल. अध्यात्मावरील विश्वास वाढेल.
▪️मकर : जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील. पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
▪️कुंभ : नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल. नवे संकल्प कराल. वाहन विषयक काम पूर्ण होईल.
▪️मीन : हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमिकांचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल.