Take a fresh look at your lifestyle.

प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास !

एकाच दिवशी 'त्यांनी' संपवली जीवनयात्रा.

जामखेड : तालुक्यातील आपटी येथे धक्कादायक घडली आहे. प्रेयसीच्या आत्महत्येनंतर काही तासांतच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. २४ रोजी एकाच दिवशी दोघांनी आपले जीवनयात्रा संपविल्याची घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप उघड झाले नाही.
अशोक बंडु कडु, वय १७, व आशा गोपीनाथ घुले वय १६ दोघे रा. आपटी ता. जामखेड अशी या प्रेमीयूगलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या येथील मुलगी आशा गोपीनाथ घुले (वय १६) हिने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही माहिती याच गावात राहत असणारा तिचा प्रियकर अशोक बंडु कडु (वय १७) यास समजली असता त्याने प्रेयसीचे घर गाठले. खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला त्या वेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे समोर आले. यानंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला यानंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसपवर स्टेटस ठेवत मी देखील माझे जीवन संपवत आहे.

काही तासातच म्हणजे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी घटनास्थळी भेट दिली.