Take a fresh look at your lifestyle.

बायका खोटं का बोलतात ? 

एकदा समजून घ्याच ! 

 

नवरा-बायकोमधील प्रेम जितके जास्त तितके वाद जास्त. जर आपण खोट्या गोष्टीबद्दल बोललो तर त्याला देखील मर्यादा नाही. बऱ्याचदा बायका इतक्या सफाईने खोटे बोलतात की, खरं काय आणि खोटं काय हे कळतच नाही. एक पत्नी सहसा आपल्या पतीशी काही बाबतीत नेहमीच खोटे बोलत असते. जर आपण त्या गोष्टी ओळखस आपण आपल्या पत्नीचे खोटे सहज पकडू शकता.
● बायका शॉपिंगला गेल्यावर जेव्हा जास्त किंमतींची वस्तू खरेदी करतात तेव्हा त्या योग्य किंमत सांगण्यासाठी पती किंवा कुटुंबाशी खोटे बोलतात. जर किंमत सांगताना गफलत होत असेल तर तुम्हाला खोटं सांगितलं जातंय.
● पत्नी वाईट परिस्थितीतून घराचे रक्षण व्हावे यासाठी बचत करते. यासाठी ती वेळोवेळी पतीकडून पैसे घेते. हे करण्यासाठी अनेकदा तिला गोष्टी लपवाव्या लागतात.
● बहुतेक बायका पतीला आपल्या आजाराबद्दल खरं काही सांगत नाही. जेणेकरून घरातील लोक त्यांच्यामुळे अस्वस्थ होऊ नयेत. मात्र हे चुकीचे आहे.
● स्त्रिया बर्‍याचदा आपल्या पतीबद्दल त्यांच्या मित्रांसमोर त्यांच्या स्टेटसबद्दल (परिस्थिती) खोटे बोलतात. कारण आपल्या कुटुंबासाठी त्या काहीही करायला तयार असतात.
● महिला बर्‍याचदा बाहेर जेवायला गेल्यावर आपल्या आवडीच्या डिशची ऑर्डर देत नाही. दुसऱ्यांच्या तावडीत स्वतःला अ‍ॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करता राहतात.
● बहुतेक बायकांना आपल्या पतीचे मित्र आवडत नाहीत. मात्र तरीही आपल्या पतीसमोर त्यांना काहीही बोलण्यासाठी त्या टाळा-टाळ करतात.
● अनेकदा महिला आपल्या पतीसमोर त्यांच्या भविष्याबद्दल खोटे बोलतात. कारण पुरुषांना सहसा हे आवडत नाहीत.
● बहुतेक स्त्रिया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना आनंदी ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या गरजेनुसार कार्य करण्यासाठी खोटे बोलत असतात.
● बायका पतीकडून त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती जाणून घेण्यास नकार देतात. किंवा त्यांना यात रस नसल्याचे दाखवतात. याउलट त्यांना नवऱ्याच्या भूतकाळाबद्दलच्या सर्व काही जाणून घ्यायचे असते.

● महिलांला एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाताना किंवा भेट देतानाही घराच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक चिंता असते की, यावेळी त्यांचे सीरियल चुकले तर. अशा परिस्थितीत नवऱ्याने तक्रार केली तर त्या खोटे बोलून विषय टाळून नेतात.