Take a fresh look at your lifestyle.

लोकाभिमुख सरपंच :दशरथराव फंड

अभिष्टचिंतन विशेष

 

 

जिद्दीला कष्टाची,कष्टाला चिकाटीची,चिकाटीला आत्मविश्वासाची आणि आत्मविश्वासाला कृतीची जोड मिळाली की यश फारसे दुर राहत नाही असं म्हणतात.

असच एक उत्तुंग व्यक्तिमत्व दशरथराव फंड या जिद्दी तरूणाच्या जिवन प्रवासावर शेखर एस. फंड यांनी टाकलेला एक प्रकाशझोत…..

गाव बाभुळसर खुर्द.

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दशरथराव यांचा जन्म झाला,सुरूवातीची परिस्थिती बेताचीच परंतु त्या परिस्थितीवर ही मात करत त्यांनी जिवनाच्या या विद्यापिठात अनुभवाचे धडे घेत त्यांनी आपल्या आयुष्याला एक नवा आकार दिला,

कटू अनुभव दुर सारीत आयुष्यात असंख्य माणसं जोडली.माणुसकीच्या बळावर एकेक माणुस आपलासा करत त्यांनी आपल्या हितचिंतकांची मोठी फळी समाजकारणात व राजकारणात तयार केली.म्हणुनच एक तरूण लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणुन त्यांची शिरूर पंचक्रोशीत व तालुक्याला जवळुन ओळख आहे.

आईवडिलांच्या प्रेरणेने व मित्रांच्या प्रोत्साहानामुळे दशरथराव यांच्यामधे समाजकारणाची आवड निर्माण झाली.सुरूवातीपासुनच समाज हिताच्या विवीध कार्यक्रमात सहभागी होऊन समाजातील तळागळातील गोरगरीबांना मदतीचा हात देण्यात ते धन्यता मानत आले..सर्वांच्या मदतीला धावुन जाणारा एक सच्चा माणुस म्हणुनही त्यांची पंचक्रोशीला जवळुन ओळख आहे.

त्यांच्यातील या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच त्यांनी आयुष्यात असंख्य माणसं जोडली.पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेत्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले.

याच बळावर १५ वर्षापुर्वी दशरथरावांचा सामाजिक कार्याच्या माध्यमातुन व थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने गावचे उपसरपंच म्हणुन राजकारणात प्रवेश झाला.

गोरगरीबांच्या अडचणी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा माणुस हळुहळु गावकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनला.

दशरथराव फंड हे नाव गावकऱ्यांसाठी हक्काचं व जिव्हाळ्याचं स्थान वाटु लागलं.

गावानी त्यांच्यावर टाकलेल्या अतुट विश्वासाला कधीही तडा जाणार नाही असा विश्वास त्यांनी प्रत्येकाला दिला.

गावचं पद भुषवत असताना कसल्याही मोठेपणात न मिरवता एक कार्यकर्ता म्हणुन समाजसेवा करण्यातच त्यांनी समाधान माणलं.

समाजासाठी गोरगरीबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ, सर्वांना मदतीचा हात देण्याची वृत्ती, सामाजिक विकासाची त्यांच्या मनात असलेली महत्वकांक्षा,आपल्या गावचा संपुर्ण कायापालट करण्याची त्यांच्या मनात असलेली ओढ, याची योग्य सांगड घालत त्यांनी गावचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात केली..गावचा सर्वांगीन विकास करायचा असेल तर प्रथमतः गावातील तरूण हा स्वतःच्या पायावर उभा राहीला पाहीजे हे त्यांनी अचुक ओळखल होतं. गावातील तरूणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना रांजणगाव एमआयडीसीमधील विविध कंपन्यांमधे वेळोवेळी स्वतः पाठपुरावा करून गावच्या तरूण वर्गाला प्रथम नोकऱ्यांची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली.

गावातील असंख्य तरूण आज स्वयंभु आणि आपापल्या पायावर उभे आहेत याचं सर्वस्वी श्रेय जातं ते दशरथरावांना आणि त्यांच्या दुरदृष्टीला..

गावातील गोरगरीबांच्या कुटुंबात जाऊन त्यांच्या अडचनी जाणुन घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना स्वताकडेही दुर्लक्ष होत होतं,परंतु समाजसेवेचा घेतलेला वसा त्यांना शांत बसु देत नवता.कित्येक कुटुंबाची विस्कटलेली घडी दशरथरावांनी पुन्हा बसवली.

कित्त्येक गरीबांना विझलेल्या चुली नव्याने पेटवण्यासाठी कधी आर्थिक तर कधी मानसिक पाठबळ दशरथरावांनी दिलं.उन वारा पाऊस न पाहता हा समाजसेवेचा वसा आजही अखंड असाच अविरत चालु आहे.

आणि या साठी बळ मिळतं ते गोरगरीबांनी तोंडभरून दिलेल्या आशिर्वादातुन,आणि थोरामोठ्यांनी पाठीवरून फिरवलेल्या कौतुकाच्या हातामधुन..

ना कसला गर्व ना कोणता मोह,

ध्यास फक्त एकच,समाजसेवा आणि गावचा सर्वांगीन विकास.

जिथे गती असते तीथे गतिरोधक सुद्धा असतो, त्याचप्रमाणे गावची व समाजाची सेवा करताना अनेक गतिरोधकांचाही सामना त्यांना करावा लागला..परंतु खचुन न जाता थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेऊन तेवढ्याच वेगाने हा माणुस दुप्पट गतीने आपलं समाजकार्य करत राहीला..परंतु गावचा सर्वांगीण विकास करताना मात्र अनेक अडचणी वेळोवेळी समोर येऊ लागल्या..कधी आर्थीक तर कधी राजकिय पाठबळ.

जोपर्यंत पाठीशी खंबीर राजकिय पाठबळ नाही तो पर्यंत गावचा विकास फक्त कागदोपत्री राहतो ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली.या अडचणीवर मात्र त्यांनी प्रभावीपणे मात केली.

दशरथरावांच्या कामाचा झपाटा आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांची असलेली तळमळ पाहुन त्यांना खंबीर साथ मिळाली ती आजचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असलेले आदरनिय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची.

वळसे पाटील साहेब त्या वेळी विधानसभेचे अध्यक्ष होते.

दशरथरावांच्या कामाचा आढावा घेऊन आदरनिय वळसे साहेबांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यपदाची मोठी जबाबदारी दशरथरावांना दिली.

आणि मग मात्र दशरथरावांनी कधी मागे वळुन पाहीलंच नाही.

प्रचंड आत्मविश्वासाच्या सामर्थ्यावर अविरत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या या माणसाची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेतली व अनेक पुरस्कार देऊन सन्मानीतही केलं.

त्यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्या नंतर गावाने पुर्ण ताकतीने पाठीशी उभं राहुन त्यांना पुन्हा एकदा एकहाती सत्ता देऊ केली व थेट सरपंच पदावर विराजमान केलं.

गावाने पुन्हा एकदा दाखवलेल्या या विश्वासामुळे दशरथरावांच्या जबाबदाऱ्या मात्र दुप्पट झाल्या.

समाजकार्यासाठी स्वतःला वाहुन घेतलेल्या दशरथरावांनी आपल्या कामाचा वेगही दुप्पट केला.

तेव्हा गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीएम.आय.डी.सी.क्षेत्रासाठी संपादित केल्या होत्या.

शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता.शेतीच गेली तर पिकवायचं काय,आणि कमवायचं काय हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असताना संपुर्ण गाव एक आशेचा किरण म्हणुन दशरथरावांकडे पाहत होता.

या शेतकऱ्यांच्या जमीनी परत मिळवणं आणि जमीनीवरचं संपादन हटवुन शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी परत मिळवुन देण्याचं हे अत्यंत जिकीरीचं काम पार पाडण्याचं दशरथरावांनी ठरवलं आणि मैदानात उतरले. शेतकऱ्यांना आणि गावाला त्यांनी विश्वास दिला आणि सुरू झाला बाभुळसर गावापासुन थेट मुंबई मंत्रालयापर्यंतचा रोजचा संघर्ष.

तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष असलेले मा.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची मोठी मदत झाली.संघर्ष चालुच होता, अतिशय जिकीरीचं हे प्रकरण दशरथरावांनी एका वर्षात तडीस नेलं. आणि एका वर्षात सरकारने लेखी स्वरूपात शेतकऱ्यांच्या जमिनीवरचं संपादन हटवल्याचं सांगितलं.

दशरथरावांच्या प्रयत्नांना यश आलं आणि शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या आनंदाला एक उधान आलं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आनंद हीच दशरथरावांच्या कामाची पावती,आणि हीच पावती दशरथरावांच्या हाताला आणि जिद्दीला बळ देण्याचं काम करते.

एका सर्वसामान्य कुटुंबातुन आलेल्या या माणसाने शुन्यातुन आपले विश्व निर्माण केले.

माणुसकी जपनारा माणुस,दिल्या शब्दाला जागणारा आणि समाज हितासाठी नेहमीच झटणाऱ्या या माणसाने समाजसेवेसाठी स्वतःला अक्षरशः वाहुन घेतले, म्हणुनच आज पंचक्रोशीला त्यांच्या विषयी प्रचंड आदर आहे,विश्वास आहे.

आपला माणुस म्हणुन प्रत्येकाच्या मनात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातुन सरपंचांनी गावाचा कायापालट केला.

गावची शाळा ही गावचा चेहरा असतो म्हणतात आणि या गावच्या शाळेसाठी नविन इमारत बांधुन शाळा सुसज्ज केली,शाळेचं सुशोभीकरण केलं.

ग्रंथालय उभारले,गावचे रटाळ झालेले अंतर्गत रस्ते पक्के केले.

घरोघरी पाणी पोहचवुन गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीची वनवन थांबवली.

समाजमंदिरं उभारली,वर्षानुवर्ष पडझड झालेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला,स्मशानभुमी सुधारणा केली.गावाला २४ तास लाईटची सुविधा केली.

घरोघरी सौरदिवे बसवले.

महीला सक्षमिकरणासाठी गावात अनेक महिला बचतगट स्थापण करण्याचे अवाहन करून बचत गटांमार्फत लघुउद्योगाला मोठ्या प्रमाणात मदत सुरू केली.

अशी असंख्य विकासकामं करून गावाचा अक्षरशः चेहरा मोहरा त्यांनी बदलुन टाकला.

परखड वृत्ती,माणुसकी प्रधान स्वभाव,माणसं जोडण्यासाठी त्यांच्याकडं असलेली कला,प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची त्यांची प्रवृत्ती आणि मैत्रीसाठी जागणारा सच्चा मित्र म्हणुन त्यांचा असणारा लौकीक याच बळावर सरपंच दशरथराव फंड यांनी समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आपण ज्या समाजात घडलो,वाढलो त्या समाजाचे उतराई होण्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ नेहमीच त्यांच्यामधे दिसुन येते.

या आज पर्यंतच्या प्रवासात तुम्ही असंख्य विकासकामं उभी करून गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते व सर्वसामान्यांची मने जिंकली.

एक माणुसकीप्रधान माणुस म्हणुन आम्हा सर्वांना तुमचा खुप खुप आदर आहे.

मला विश्वास आहे की या पुढे राजकारणात येऊ पाहणारा प्रत्येक प्रभावी तरूण तुमच्याकडे एक आदर्श म्हणुन पाहील..

आज पर्यंत तुम्ही जी काही गावची सेवा केली,जो संघर्ष आज पर्यंत तुम्ही आमच्यासाठी करत आलात त्या तुमच्या संघर्षाची कहाणी अशीच काही शब्दात लिहणं शक्य नाही.

परंतु तुमच्या ऋणांचे पायीक होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हेच आमचं सुदैव.

अशा या अष्टपैलु व्यक्तीमत्वाला अभिष्टचिंतनाच्या_कोटी_कोटी_शुभेच्छा.

▪️शेखर एस.फंड