Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸25 नोव्हेंबर 2021 

▪️मेष : हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
▪️वृषभ : नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल.
▪️मिथुन : सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा. आवडती व्यक्ति भेटेल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत.
▪️कर्क : संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी. अंतिम निर्णयाला पोहोचायला वेळ लागेल.
▪️सिंह : नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल. धनलाभ संभवतो. मनाची द्विधावस्था टाळावी.
▪️कन्या : कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल.
▪️तूळ : दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
▪️वृश्चिक : अनैतिक कृत्ये करू नयेत. नामस्मरणाने लाभ होईल. राजकीय खेळ खेळू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.
▪️धनू : राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल. आपली आवड जोपासाल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या.
▪️मकर : आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. आवश्यक ठिकाणीच खर्च कराल. मनाजोगी कमाई करता येईल.
▪️कुंभ : महिलांनी सबुरीने वागावे. मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
▪️मीन : मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. कागदपत्रे जपून ठेवावीत. नावडत्या घटनांनी निराश होऊ नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे.