Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंके म्हणाले, तुम्ही फक्त कामे सुचवा,निधी कमी पडू देणार नाही !

नगर : तालुक्यातील नवनागापूर येथे राष्ट्रीय पेयजल योजना (जलजीवन मिशन) अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना व घनकचरा तसेच सांडपाणी व्यवस्थापन कामांचा शुभारंभ नगर पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचे हस्ते पार पडला.राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ९ कोटी ८१ लक्ष ७२ हजार तर घनकचरा तसेच सांडपाणी व्यवस्थापन कामांसाठी ९७ लक्ष इतका भरघोस निधी आ.लंके यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे गावला मिळाला आहे.त्यामुळे नवनागापूर गावाचा जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना आ.लंके म्हणाले की.नवनागापूर गाव हे शहरालगत असल्यामुळे गावाचा विकास शहराच्या बरोबरीने झाला पाहिजे.त्यामुळे तुम्ही मला विविध विकासकामे सुचवा मी तुमचा आमदार म्हणून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.तसेच ग्रामपंचायतीने मला जागा उपलब्ध करून द्या मी गावासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी भव्य सांस्कृतिक भवन व गार्डनसाठी उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले.
यावेळी कार्यक्रमाला नवनागापूरचे सरपंच डॉ.बबनराव डोंगरे, उपसरपंच संगिता सप्रे, ग्रामपंचायत सदस्य महेश कांडेकर,बाबा भोर,सागर सप्रे, दीपक गिते, गोरक्षनाथ गव्हाणे, अर्जुन सोनवणे,महीला सदस्य हेमा चव्हाण,मंगल गोरे,चंद्रभागा डोंगरे, उद्योजक विशाल चव्हाण, विकास जगताप, विनोद ठुबे,प्रभोध तुपे, वडगाव गुप्ताचे माजी सरपंच भाणूदास सातपूते, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, राजेंद्र ढेपे,निबळकचे सरपंच अजय लामखडे, सचिन गवारे, प्रविण वारुळे आ.लंके यांचे स्वीयसाह्यक शिवाजी कराळे, कामगार नेते योगेश गलांडे,नरेश शेळके, अशोक शेळके, शंकर शेळके,अंगनवाडी सेवीका, मदतनीस, आरोग्य सेवीका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार गव्हाणे सर यांनी मानले.