Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या मल्लांनी गाजविले पाथर्डीचे मैदान !

0
पाथर्डी : येथे उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होत.स्पर्धेच्या दोन्ही दिवशी मल्लांनी उत्कृष्ट कुस्त्या करत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
शिव छत्रपती कुस्ती संकुलन पारनेर येथील पै.ऋषिकेश लांडे व पै.अनिल ब्राम्हणे यांनी उत्कृष्ट कुस्त्या करत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचे नाव राज्यात गाजवले.
पै.ऋषिकेश लांडे याने ८४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला तसेच पै.अनिल ब्राह्मणे याने खुल्या गटात तृतीय क्रमांक पटकावला.
त्यांच्या यशाबद्दल शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचे संस्थापक अध्यक्ष पै. युवराजदादा पठारे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभास ऍड. प्रतापराव ढाकणे , अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे व आदीं मान्यवर उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.