Take a fresh look at your lifestyle.

वळसे पाटलांनी जागविल्या मोमीन कवठेकरांच्या आठवणी !

शिरूर : बी. के. मोमीन यांच्यासारखी अनेक रत्ने समाजत आहेत. समाजाने त्यांना पुढे आणावे त्यांना पैलू पाडण्याचे काम करावे, हीच खरी बीके मोमीन यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक लोकगीतकार व कवी बी. के मोमीन कवठेकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या कवठे येमाई या मूळ गावी ग्रामस्थांनी शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी श्रद्धांजली वाहताना गृहमंत्री वळसे-पाटील बोलत होते.
बी. के. मोमीन हे जरी आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या साहित्याचे रूपाने ते अमर आहेत. त्यांनी लिहिलेले साहित्य समाजाला दिशा देणारे ठरणार आहे. बी के मोमीन यांनी खूप मोठे काम केलं एवढा मोठा साहित्यिक परंतू केवळ ग्रामीण भागातले असल्यामुळे ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले, अशी खंतही वळसे पाटील यांनी
व्यक्त केली.
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले बी.के मोमीन हे माझे जिवश्च कंठश्च मित्र होते. त्यांनी मला अखेरपर्यंत साथ दिली आम्ही शालेय जीवनापासून एकत्र होतो ज्या वेळी त्यांच्या निधनाची बातमी मला समजली त्यावेळी अतिशय दुःख झाले. ते त्यांची गाणी आणि इतर साहित्यातून कायम आपल्यातच राहतील.
ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगाराम बुवा कवठेकर म्हणाले, बीके मोमीन हा माझा भाचा होता खूप कष्ट करून त्यांनी नाव कमावले दत्ता महाडिक यांच्या सारखी अनेक माणसे मोठे गेली पण आज भाच्याला निरोप देण्याची वेळ मामावर आली यासारखे दुःख नाही. त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वराने द्यावे. यावेळी बी के मोमीन यांच्या आठवणी सांगताना गंगाराम कवठेकर भावनाविवश झाले होते.
शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, महाराष्ट्र युवा जनता दलाचे अध्यक्ष नाथा शेवाळे, कारेगावचे माजी उपसरपंच सयाजी राजे नवले , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गवारे, चित्रपट निर्माते संजय पाटील, चित्रपट कथालेखक मोहन पडवळ, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे , माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, प्रभाकर गावडे, गणेश जामदार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक तमाशा कलाकार कवठे यमाई गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी के मोमीन कवठेकर यांचे चिरंजीव पत्रकार अन्वर मोमीन यांनी सूत्रसंचालन केले तर रशीद मोमीन यांनी आभार मानले.